Skip to Content

All About Planting माहिती संग्रालय

 माहिती संग्रालय कमळ वाटरलीली लागवड माहीती

 माहीती संकलन राहुल तायडे जळगाव          

  प्रश्न क्रमांक 1 -कमळ वाटरलिली फक्त तळ्यात किंवा तलावात फुलते का ? 


  ऊत्तर - नाही आत्ता बर्याच हायब्रीड व्हरायटी आलेल्या आहेत ज्या छोटया प्लास्टिक टब मधे आपल्या 


  टेरेस गार्डन मधे परसबागेत फुलवू शकतो


  प्रश्नक्रमांक 2 कमळ वाटरलिली ला सर्वात महत्त्वाचे काय आहे ज्या शिवाय ते फुलु शकत नाही 


  ऊत्तर - सुर्यप्रकाश 


  कमित कमी तीन तास किंवा जीतका जास्तीत जास्त वेळ मिळेल तो ऊत्तम ( कमळ वाटरलिली इनडोअर प्लान्ट मुळीच नाही बरका ! ) 


  प्रश्न क्रमांक 3 कमळ वाटरलिली जर आपल्या घरी लावायचे असेल तर काय तयारी करावी


  ऊत्तर - ज्या जागेवर जास्त वेळ डायरेक्ट सुर्यप्रकाश पडतो ती जागा निवडावी न मिळाल्यास टेरेसवर लावावे


  प्लास्टिक टब घ्यावा ऊंची जवळजवळ 1 फुट , रुंदी जवळजवळ दोन फुट


   माती जी मिळाली ती चालेल त्यात मोठे दगड नकोच


  शेनखत जुने कुजलेले व गांडुळखत 


  अगोदर टब मधे शेनखत व गांडुळखत खाली टाकावे एक दोन इंचाचा थर त्यावर माती टाकुन टब अर्धा पेक्षा थोडा कमी भरायचा शेनखत गांडुळखत न मिळाल्यास फक्त माती टाकली तरी चालेल 


  आत्ता आपल्याला टब मधे पाणी भरायचे आहे पण ते मातीने गढुळ होऊनये म्हणून टब मधील मातीवर प्लास्टिक केरीबॕग किंवा प्लेट ठेवायची व पाण्याचा फोर्स प्लेट किंवा केरीबॕग वर ठेऊन टब पुर्ण भरायचा व पाणी भरुन झाल्यानंतर प्लेट कीवा प्लास्टिक क्यारीबॕग ऊचलुन घ्यायची तीन चार दिवसा नंतर टब मधील संपूर्ण पाणी काढुन कंद किवा रोप वरचे वर चिखलात लावायचे आणि मुळ चिखलात खोचायचे नंतर टब परत पाण्याने हळु हळु भरुन टाकायचा


  दोन दिवसांनी पाणी स्वच्छ दिसायला लागले की त्यात गप्पी मासे टाकायचे 


  हे मासे आरोग्य केंद्रात मिळतात


  न मिळाल्यास रंगीत मासे विकनार्या शॉप वरील मोली गप्पी व प्लेटी या जातीचे मासे टाकले तरी चालतात त्या मुळे डास होत नाहीत व आपल्या परीसरातील डास कमी होतात कारण आपल्या टब मधे डासांनी दिलेली अंडी अळ्या मासे खाऊन घेतात




  प्रश्न - आमच्या कडे कमळ वाटरलिली आहे पन फुले का येत नाहीत


  ऊत्तर - कारण 1 तुम्ही ज्या ठिकाणी लावले आहे तेथे सुर्यप्रकाश दोन तासा पेक्षा कमी येत असेल


  कारण दुसरे तुम्ही तलावातील कमळ वाटरलिली आनले असेल जे जागा जास्त मिळाली तरच फुलते तर आपल्या छोट्या टब मधे कसे फुलनार आणि फुल आले तरी वर्षातुन एक दोनच 


  सामान्य माहीती -

  कमळ वाटरलिली इतर शोभिवंत झाडां पेक्षा लावायला व सांभाळायला सोपे असते कारण इतर रोपांना पाणी कमी किंवा जास्त झाले तर ते खराब होतात पण कमळ वाटरलिली टब मधे एकदाच टब पाण्याने फुल भरायचा असतो नंतर सुर्यप्रकाश मुळे वाफ होऊन जितके पाणी कमी होइल तीतके भरायचे असते

पाणी बदलवायची गरज नसतेच


   कमळ वाटरलिली मधे आत्ता अनेक व्हरायटि आलेल्या आहेत वाटरलिली मधे काही सिजनल तर काही रोजच फुले येनार्या व्हरायटी ऊपलब्ध आहेत .

  तर कमळ मधे स्थानीक कमळ व हायब्रीड कमळ असतात

  कोणतेही कमळ सिजनलच फुलते पण स्थानीक कमळ पेक्षा हायब्रीड कमळाला जास्त फुले व पाकळ्या येतात


  संपूर्ण महाराष्ट्रात आमचे ह्यापी कस्टमर आहेत आहेत


  कमळ वाटरलिली कंद रोप कुरीयर बॉक्स व्यवस्तीत पॕक केल्यास मधे आठ नऊ दिवस चांगला राहु शकतो आणि महाराष्ट्रात कुठेही तीन चार दिवसात पोहचतो


  कमळ व वाटरलिली विषयावर अधीक माहीती साठी आम्हाला संपर्क करु शकता ज्यांनी आमच्या कडुन कमळ वाटरलिली घेतले नसेल त्यांना पण मार्गदर्शन मिळेल


  लेखन - राहुल तायडे जळगाव


  पद्मनाभ लोटस व वाटरलिली नर्सरी जळगाव 


  संपर्क क्रमांक 7030887388



Lotus Waterlily Cultivation Information

Compilation Rahul Tayde Jalgaon


  Question No. 1 -Does lotus waterlily bloom only in ponds or lakes?


  Answer - No, now there are many hybrid varieties that can be grown in small plastic tubs, which can be grown in your


  terrace garden, backyard


  Question No. 2 What is the most important thing for lotus waterlily without which it cannot bloom?


  Answer - Sunlight


  At least three hours or as much time as possible is best (lotus waterlily is not an indoor plant at all, thank goodness!)


  Question No. 3 What preparations should be made if you want to plant lotus waterlily in your home


  Answer - Choose a place where direct sunlight falls for a long time. If not, plant it on a terrace


  Take a plastic tub, about 1 foot high and about 2 feet wide


  Whatever soil you get will work, no big stones should be used


  Old rotted manure and vermicompost


  Previously, put a layer of vermicompost and vermicompost in the tub, add a layer of soil on top and fill the tub with it. If you do not have vermicompost, just add soil.


  Now you need to fill the tub with water, but since it is muddy with soil, place a plastic shopping bag or plate on the soil in the tub and fill the tub completely by placing the water force plate or shopping bag on it. After filling the water, remove the plate or plastic shopping bag. After three or four days, drain all the water from the tub and place the tuber or plant on top of the mud and bury the roots in the mud. Then slowly fill the tub with water again.


  After two days, when the water starts to look clear, add guppy fish.


  These fish are available at health centers.


  If you do not have these, you can also add fish such as molly guppy and platy from the colorful fish shop. They do not cause mosquitoes and the number of mosquitoes in your area decreases because the eggs laid by mosquitoes in your tub are eaten by the larvae of the fish. Takes


  Question - We have a lotus water lily, but why are they not flowering


  Answer - Reason 1: The place where you have planted it may receive less than two hours of sunlight


  The second reason is that you have planted a lotus water lily from a pond, which blooms only if it gets more space, so how can it bloom in your small tub and even if it does bloom, it only blooms once or twice a year


  General information -

  Lotus water lily is easier to plant and maintain than other ornamental plants because other plants get damaged if they get too much or too little water, but in a lotus water lily tub, the tub needs to be filled with water once and then the water that evaporates due to sunlight needs to be filled as much as it reduces


  There is no need to change the water


  Lotus water lily has many varieties now, some are seasonal and some are daily flowering varieties.

  So, in lotus, there are local lotus and hybrid lotus.

  Any lotus blooms seasonally, but hybrid lotus has more flowers and petals than local lotus.


  We have happy customers all over Maharashtra.


  If lotus waterlily tubers are packed in a courier box system, they can stay good for eight to nine days and reach anywhere in Maharashtra in three to four days.


  For more information on lotus and waterlily, you can contact us. Those who have not bought lotus waterlily from us will also get guidance.


  Written by - Rahul Tayde Jalgaon


  Padmanabh Lotus and Waterlily Nursery Jalgaon


  Contact number 7030887388